News Flash

शुबमन गिलचा धमाका! मोडला सुनील गावसकरांचा ५० वर्ष जुना विक्रम

शुबमन गिलने केला दमदार पराक्रम

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा शुबमन गिल याने दमदार अर्धशतकी खेळी केली. आपला तिसराच कसोटी सामना खेळणारा शुबमन गिल याने १४६ चेंडूत त्याने ९१ धावांची खेळी केली. शतकाने त्याला हुलकावणी दिली पण त्याने लिटल मास्टर सुनील गावसकरांचा विक्रम मोडीत काढला.

दुर्दैवी! निवडणूक जिंकली पण क्रिकेट खेळताना मैदानातच झाला मृत्यू

शुबमन गिलने अतिशय दमदार फलंदाजी केली. चौथ्या डावात रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर गिलने पुजाराच्या साथीने खेळ पुढे चालू ठेवला. नव्वदीत असताना त्याने नॅथन लायनच्या बाहेरच्या रेषेत असलेल्या चेंडूला बॅट लावली आणि तो झेलबाद झाला. पण ८ चौकार आणि २ षटकारांसह त्याने भारताला लय मिळवून दिली. या खेळीसोबतच गिलने सुनील गावसकर यांचा ५० वर्ष जुना विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात अर्धशतक ठोकणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय ठरला. गिलने २१ वर्ष आणि १३३ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. गावसकरांनी १९७०-७१ मध्ये वेस्ट इंडिविरूद्ध २१ वर्षे आणि २४३ दिवसांचे असताना चौथ्या डावात अर्धशतक झळकावलं होतं. गावसकर त्या डावात ६७ धावाच करू शकले होते.

मराठमोळ्या शार्दुलच्या ‘त्या’ कृतीचा प्रत्येक भारतीयाला वाटतोय अभिमान

दरम्यान, पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतल्यावर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४वर आटोपला. स्टीव्ह स्मिथने दमदार अर्धशतक (५५) ठोकलं. डेव्हिड वॉर्नर (४८), मार्कस हॅरिस (३८) आणि कॅमेरॉन ग्रीन (३७) या तिघांनीही चांगल्या छोटेखानी खेळी केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला २९४ धावांपर्यंत मजला मारता आली आणि त्यांनी भारताला ३२८ धावांचे लक्ष्य दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 10:06 am

Web Title: team india opener shubman gill breaks sunil gavaskar 50 years old record becomes youngest to score 50 in fourth innings ind vs aus vjb 91
Next Stories
1 दुर्दैवी! निवडणूक जिंकली पण क्रिकेट खेळताना मैदानातच झाला मृत्यू
2 … तर पराभवापेक्षाही ऑस्ट्रेलियावर मोठी नामुष्की ओढवेल – पाँटिग
3 IND vs AUS : शुबमनचा अर्धशतकी तडाखा; सामना रंगतदार अवस्थेत
Just Now!
X