भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांवर आटोपला. रविचंद्रन अश्विनचे ६ बळी, शाहबाज नदीमचे २ बळी आणि इशांत-बुमराहचा एक-एक बळी यांच्या कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ स्वस्तात माघारी परतला. तरीदेखील पहिल्या डावातील मोठ्या आघाडीमुळे त्यांनी भारतापुढे ४२० धावांचे आव्हान ठेवले आणि भारताने दिवसअखेर १ बाद ३९ धावा केल्या. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात १ गडी घेणाऱ्या इशांत शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये ३०० धावांचा टप्पा ओलांडला, पण तरीही त्याच्या नावे एका नकोशा विक्रमाची नोंद झाली.

ऋषभ पंतला ICCकडून मानाचा पुरस्कार जाहीर

वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कसोटी कारकिर्दीत ३०० गडी घेण्याचा पराक्रम केला. असा पराक्रम करणारा इशांत तिसरा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला. इशांत शर्माआधी कपिल देव आणि झहीर खान या दिग्गजांनी कसोटी सामन्यात ३०० बळी घेतले होते. इंग्लंडविरोधात चेन्नई येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात इशांतने लॉरेन्सला बाद करत दमदार कामगिरी केली. इशांतने ९८ व्या कसोटी सामन्यात ३०० बळींचा टप्पा ओलांडला. त्यामुळे हा टप्पा ओलांडण्यास सर्वाधिक उशीर करणारा गोलंदाज हा नकोसा विक्रम त्याच्या नावे झाला. याआधी डॅनियल व्हेटोरी याने ९४व्या कसोटीत ३०० बळींचा टप्पा ओलांडला होता, त्यामुळे हा विक्रम त्याच्या नावावर होता.

IND vs ENG: तब्बल २० वर्षांनी ‘टीम इंडिया’बाबत घडला ‘हा’ दुर्दैवी योगायोग

इशांतने या सामन्यात एकूण तीन गडी बाद केले. ते तिन्ही गडी त्याच्यासाठी खास ठरले. पहिल्या डावात त्याने सर्वप्रथम जोस बटलरला बाद केले. तो इशांतचा मायदेशातील प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २५०वा बळी ठरला. त्यानंतर त्याने जोफ्रा आर्चरचा बळी टिपला. तो त्याचा भारतीय मैदानावरील १००वा कसोटी बळी ठरला. तर डॅन लॉरेन्सला त्याने दुसऱ्या डावात बाद केले. तो त्याचा ३००वा कसोटी बळी ठरला.