न्यूझीलंडविरुद्ध रंगणाऱ्या आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडला पोहोचला आहे. तेथे संघाने आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला. आता विराटसेनेने आपल्या तयारीला सुरुवात केली असून त्यांच्या सरावाचे फोटो व्हायरल झाले आहे. १८ जूनपासून इंग्लंडच्या साऊथम्प्टन येथे हा सामना होणार आहे.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सराव करतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. दुखापतीमुळे जडेजा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकला नव्हता. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला त्याच्या जागी संधी देण्यात आली आणि त्याने चमकदार गोलंदाजी केली.

हेही वाचा – WTC Final : विराट-रोहितसाठी ‘ही’ असणार चिंतेची बाब, दिलीप वेंगसरकरांनी दिलं मत

या फोटोंमध्ये जडेजा गोलंदाजीचा सराव करताना दिसून येत असून साऊथम्प्टनमध्ये पहिली आउटिंग, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. जडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र, अंतिम सामन्यात त्याला संधी मिळेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या संघाचा भाग नसल्याने या दोघांनाही संघात समाविष्ट करता येईल, असे मत अनेक महान खेळाडूंनी दिले होते.

 

इंग्लंडमध्ये जडेजाची कामगिरी

रवींद्र जडेजाने इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामने खेळले, यात त्याने ४२च्या सरासरीने १६ गडी बाद केले आहेत. शिवाय फलंदाजीत त्याने २ अर्धशतकांसह २७६ धावा केल्या आहेत. ७९ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

हेही वाचा – टोकियो ऑलिम्पिकदरम्यान खेळाडूंना दिले जाणार १,६०,००० लाख मोफत ‘कंडोम’

एकूणच कसोटी कारकिर्दीत जडेजाने ५१ कसोटी सामन्यात २२० बळी घेतले आहेत. फलंदाजी करताना त्याने एक शतक आणि १५ अर्धशतकांच्या मदतीने १९५४ धावा केल्या आहेत.