News Flash

जेव्हा विराट कोहली ‘द ग्रेट खली’ला भेटतो…

खलीचा 'विराट' देह पाहून कोहली विस्मयचकित

Virat Kohli met The Great Khali : विराटला खलीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

एरवी सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. कोहलीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून रविवारी रात्री WWE स्टार ‘द ग्रेट खली’सोबतचा फोटो शेअर केला. खलीला भेटणे हा माझ्यासाठी खास अनुभव होता. तो एक चांगला खेळाडू आहे, असा संदेशही कोहलीने ट्विटमध्ये लिहला आहे.

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने काल कोलंबो कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघ विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता. त्या ठिकाणी खलीही आला होता. त्यावेळी विराटला खलीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. कोहलीने खलीसोबत दोन फोटो काढले आहेत. यापैकी उभे राहून काढलेल्या फोटोत खलीचा ‘विराट’ देह पाहून कोहलीच्या चेहऱ्यावर उमटलेल्या विस्मयचकित झाल्याच्या भावना स्पष्टपणे दिसत आहेत.

Next Stories
1 विराट कोहली आणि शिखर धवनने असा साजरा केला फ्रेंडशिप डे
2 पाकिस्तान भारताशी खेळला नाही तर आयसीसीचे मोठे नुकसान होईल- जावेद मियाँदाद
3 दिव्यांग खेळाडूंच्या ‘मन की बात’ जाणली!
Just Now!
X