25 September 2020

News Flash

Video : एकच फाईट वातावरण टाईट!; कुस्तीच्या रिंगणात हरभजनचा जलवा

हरभजनच्या एका फाईटमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडू थेट रिंगबाहेरच जाऊन कोसळला..

टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंग याने क्रिकेटचे मैदान चांगलेच गाजवले. त्याने भल्याभल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. IPL मध्ये तो अजूनही आपल्या फिरकीची जादू दाखवत आहे. मात्र आता कुस्तीच्या रिंगणात हरभजनने आपली कमाल दाखवली आहे.

हरभजन गेल्याच आठवड्यात WWE कुस्तीपटू द ग्रेट खली याच्या अकादमीत गेला होता. तिथे त्याने आपल्या ताकदीची कमाल दाखवली. हरभजन जेव्हा तेथे गेला, तेव्हा एक पोलिसाचा गणवेश परिधान केलेला माणूस रिंगणात होता. त्यावेळी हरभजन रिंगमध्ये आला आणि त्याला हरभजनने एकच फाईट दिली. त्या एका फाईटमुळे तो थेट रिंगणाबाहेरच जाऊन कोसळला.

 

View this post on Instagram

 

Some CWE time at @dalipsinghcwe Khali academy jalandhar

A post shared by Harbhajan Turbanator Singh (@harbhajan3) on

हरभजनने स्वतः इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो द ग्रेट खलीच्या जालंधर येथील अकादमीत गेल्याची माहिती त्याने दिली आहे. दरम्यान बाहेर कोसळलेल्या त्या कुस्तीपटूला या प्रकाराचा चांगलंच राग आला असल्याचा या व्हिडिओत दिसून येतो. पण त्याची तमा न बाळगता हरभजन आपल्या अंदाजात रिंगमध्ये आपला माईक खाली टाकतो.

हरभजनचा कुस्तीच्या रिंगमधील हा अंदाज साऱ्यानाच भावत आहे. दरम्यान, हरभजन सिंग सध्या संघाबाहेर आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना यूएईविरुद्ध मार्च २०१६मध्ये ढाकामध्ये खेळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 6:20 pm

Web Title: team india spinner harbhajan singh knocks out wrestler in single fight
Next Stories
1 मराठमोळ्या स्मृती मंधानाला Forbesच्या यादीत स्थान
2 गौतमने दिलं ‘गंभीर’ विषयावर स्पष्टीकरण, म्हणाला…
3 Ranji Trophy : सलग दुसऱ्यांदा विदर्भला विजेतेपदाची संधी
Just Now!
X