फिरकीच्या जादूचे अनेक प्रयोग आजवर विश्वचषक स्पर्धेने पाहिले आहेत. सामन्यावर आलेले निराशेचे सावट दूर करून संघाला विजय’श्री’ मिळवून देण्याचे बळ फिरकी गोलंदाजीत आहे. त्यात विश्वचषकासारखी महत्त्वाची स्पर्धा असताना संघात फिरकी गोलंदाजीचा एका सामर्थ्यवान किंबहूना विश्वासात्मक जोडीचा समावेश केल्याशिवाय गत्यंतर नाही. विकेट्स घेण्यासोबतच प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येवर नियंत्रण मिळवून आपल्या फिरकी जादूने दबाव निर्माण करण्याची महत्त्वाची जबाबदारी फरकीपटू पार पाडत असतात. प्रत्येक सामन्याआधी परिस्थितीचा कानोसा घेऊन संघात पूर्णकाळ गोलंदाज आणि पार्टटाइम गोलंदाज किती असावेत याचे गणित निश्चित केले जाईलच. परंतु, केवळ पार्टटाइम गोलंदाजाच्या भरवशावर संघाच्या फिरकी गोलंदाजीचा गाडा विश्वचषकासारख्या स्पर्धेत हाकता येणार नाही. त्यामुळे पार्टटाइम आणि पूर्णकाळ गोलंदाजांचा योग्य ताळमेळ राखणे संघनिवड समितीसमोर आव्हान असते. संभाव्य भारतीय संघात पूर्णकाळ आणि पार्टटाइम गोलंदाजांमध्ये सुरेश रैना, आर.अश्विन, कर्ण शर्मा, अमित मिश्रा, रविंद जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, स्टुअर्ट बिन्नी हे पर्याय ‘बीसीसीआय’च्या निवड समितीसमोर आहेत. यातील किती जणांची अंतिम पंधरा खेळाडूंच्या संघात वर्णी लागेल हे ७ जानेवारीला स्पष्ट होईलच. पण, ढोबळमानाने समजा या अंतिम पंधरा जणांच्या संघात तीन फिरकीपटूंचा समावेश करावयाचा झाल्यास कोणला संधी देण्यात यावी?

(टीप- कोणतेही तीन पर्याय निवडणे अनिवार्य)