News Flash

मोठी बातमी..! इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात संधी देण्यात आली आहे

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीकडे संघाचे कर्णधारपद असून मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे. 23 मार्चपासून ही मालिका खेळवली जाईल.

इंग्लंडविरोधातील चौथ्या टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमारने अर्धशतक साजरे करत सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडले.  विजय हजारे स्पर्धेत धावांची बरसात करणाऱ्या पृथ्वी शॉला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे. तर, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेला गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक –

  • 23 मार्च – पहिला सामना
  • 26 मार्च – दुसरा सामना
  • 28 मार्च – तिसरा सामना

(सर्व सामने पुण्यात खेळवले जाणार)

भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 10:58 am

Web Title: team india squad for odi series against england announced adn 96
Next Stories
1 Road Safety World Series: इंडिया लेजंड्ससोबत फायनलमध्ये कोण खेळणार?
2 IND vs ENG : रोहित शर्माने १० वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी सूर्यकुमार यादवने खरी ठरवली!
3 IND vs ENG: इंग्लंडविरोधातील विजयाचा शिल्पकार सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
Just Now!
X