३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ २२ मे रोजी मुंबईवरुन इंग्लंडला रवाना झाला. इंग्लंडमध्ये पोहचल्यानंतर भारतीय संघाने सरावालाही सुरुवात केली आहे. ५ जून रोजी भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. विश्वचषकासाठी प्रत्येक संघाने आपल्या जर्सीमध्ये बदल केला आहे. भारतीय संघाने आयपीएलआधी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत आपल्या जर्सीमध्ये बदल केला होता.

मात्र या बदलाव्यतिरीक्त भारतीय संघाने विश्वचषकासाठी आपल्या जर्सीमध्ये आणखी एक बदल केला आहे. अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघ नारंगी रंगाची छटा असलेली जर्सी घालणार आहे. उर्वरित सामन्यासांठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत घातलेली जर्सीच वापरणार आहे. यंदाच्या विश्वचषकात आयसीसीने, ‘होम आणि अवे’ सामन्यांसाठी वेगवेगळ्या जर्सींचा पर्याय समोर आणला आहे.

टीम इंडियाच्या जर्सीवर नारिंगी रंगाची छटा ठेवण्यात आलेली आहे

 

पहिल्या सामन्याआधी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. त्यामुळे नवीन जर्सीसोबत भारतीय संघाची या स्पर्धेतली कामगिरी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकात केदार जाधवची भूमिका महत्वाची असेल – चंद्रकांत पंडीत