इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. ५७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या खराब फलंदाजीमुळे इंग्लंडला पहिल्या डावाअखेर २४१ धावांची मोठी आघाडी मिळाली. ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला किमान तीनशेपार मजल मारता आली. इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवणार होती, पण इंग्लंडच्या कर्णधाराने तो पर्याय नाकारत पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND vs ENG: वॉशिंग्टन ‘अतिसुंदर’; दमदार फलंदाजी करत केला ‘हा’ पराक्रम

इंग्लंड दुसऱ्या डावात फलंदाजी आल्यानंतर उपहाराच्या विश्रांतीआधी केवळ २ षटकं टाकण्यात आली. त्यात इंग्लंडला केवळ १ धाव करता आली तर अश्विनने डावाच्या पहिल्याच चेंडूवर रॉरी बर्न्सला शून्यावर माघारी धाडलं.

५७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा पहिल्या डावाची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा (६), शुबमन गिल (२९), विराट कोहली (११) आणि अजिंक्य रहाणे (१) हे चार वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर संयमी चेतेश्वर पुजारा आणि धडाकेबाज ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला. चेतेश्वर पुजाराने ११ चौकारांसह ७३ धावा केल्या. तर ऋषभ पंतने ९ चौकार आणि ५ षटकारांसह ९१ धावा केल्या. त्यांच्यानंतर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरनेदेखील अर्धशतकी खेळी केली. अश्विनच्या साथीने त्याने संघाला ३००चा टप्पा पार करून दिला. अश्विन ३१ धावा केल्या. पण नंतर सुंदरला कोणाचीही दीर्घ साथ मिळाली नाही. सुंदरने १२ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ८५ धावा केल्या.

Video: अजब गजब विकेट… पुजारा कसा बाद झाला पाहिलंत का?

त्याआधी इंग्लंडचा डाव सर्वबाद ५७८ वर आटोपला. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक हे डावातील विशेष आकर्षण ठरले. त्याला आधी डॉम सिबली आणि बेन स्टोक्स यांच्या अर्धशतकी खेळींची साथ मिळाली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी थोडीफार फटकेबाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. बुमराह-अश्विनने ३-३ तर इशांत शर्मा-नदीमने २-२ बळी टिपले.