News Flash

बेन स्टोक्ससारखा ऑलराऊंडर ‘टीम इंडिया’कडे असेल तर… – इरफान पठाण

स्टोक्स ICC च्या ताज्या क्रमवारीत अव्वलस्थानी

वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्स याला ICCच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली. ICCने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले. त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला खाली ढकलत अव्वलस्थान पटकावले. स्टोक्सची कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीत पराभूत करताना स्टोक्सने दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने दीडशतक (१७६) तर दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक (७८) ठोकले. दोन्ही डाव मिळून त्याने ३ बळी घेतले. या कामगिरीसाठी स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याच्या धमाकेदार कामगिरीनंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने त्याची स्तुती केली. “जर टीम इंडियाकडे बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू खेळाडू असेल, तर भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठेही अजिंक्य राहू शकतो”, अशा शब्दात पठाणने त्याची स्तुती केली. तसेच मॅचविनर असा हॅशटगही स्टोक्ससाठी वापरला.

३ सामन्यांच्या मालिकेत बेन स्टोक्स २ सामन्यांनंतर ३४३ धावांसह सर्वाधिक धावांचा मानकरी आहे. त्याने पहिल्या कसोटीतदेखील ४३ आणि ४६ धावा केल्या होत्या. ५८९ चेंडूचा सामना करत स्टोक्स आतापर्यंत मालिकेत सर्वाधिक चेंडूचा सामना करणारा फलंदाज ठरलाय. तसेच ५ षटकार लगावत सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज हा मानही स्टोक्सलाच मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 2:10 pm

Web Title: team india will be unbeatable with all rounder like ben stokes says irfan pathan eng vs wi vjb 91
Next Stories
1 IPL सुरू होण्याआधी ‘या’ संघाविरूद्ध खेळणार टीम इंडिया?
2 संघातून वगळल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे मिळाला आधार – गांगुली
3 IPL 2020 : “UAEमधील स्पर्धेचा ‘या’ संघाला होणार फायदा”
Just Now!
X