09 December 2019

News Flash

टीम इंडियाकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

BCCI ने शेअर केला व्हिडीओ

संपूर्ण देशभरात सध्या स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात पार पडला जात आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघानेही आपल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयने रात्री बारा वाजताच्या ठोक्यावर, आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर भारतीय खेळाडूंचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, केदार जाधव, रवींद्र जडेजा यांच्यासह अन्य भारतीय खेळाडूंनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, पावसाने व्यत्यय आणल्यानंतर अखेरचा सामना ३५ षटकांचा करण्यात आला. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या सत्रात चांगलं पुनरागमन करत विंडीजला २४० धावांमध्ये रोखलं.

अवश्य वाचा – Raksha Bandhan 2019 : विंडीज दौऱ्याआधी अजिंक्यने पार पडली भावाची जबाबदारी

First Published on August 15, 2019 3:18 am

Web Title: team india wishes happy independence day to indian fans bcci posted video on social media psd 91
टॅग Ind Vs WI
Just Now!
X