ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी सलग दुसऱ्या वन-डे सामन्यातही सुरुच आहे. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत ऑस्ट्रेलियाने त्रिशतकी धावसंख्येचा टप्पा गाठला. यानंतर दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या गोलंदाजांचा ऑस्ट्रेलियाने असाच समाचार घेतला.

वॉर्नर आणि फिंच या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला भक्कम सुरुवात करुन दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी झाल्यानंतर फिंच शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. या निमीत्ताने सलग पाचव्या वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाज पॉवरप्लेमध्ये विकेट काढण्यात अपयशी ठरले आहेत.

  • विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन – ५४/०
  • विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड – ५२/०
  • विरुद्ध न्यूझीलंड, माऊंट माँगन्वी – ६५/०
  • विरुद्ध ऑस्ट्रेलिया , सिडनी – ५१/०
  • विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी – ५९/०

 

याचसोबत, सलग तीन वन-डे सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाच्या सलामीच्या फलंदाजांना १०० पेक्षा जास्त धावा देण्याची भारतीय गोलंदाजांची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

मालिकेत आपलं आव्हान कायम राखायचं असल्यास टीम इंडियाला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू या सामन्यात कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.