News Flash

भारताच्या ‘वर्ल्डकपविजेत्या’ क्रिकेटपटूनं घेतली २८व्या वर्षी निवृत्ती!

भारताबाहेर क्रिकेट कारकीर्द घडवण्यासाठी घेतला मोठा निर्णय

२०१२चा १९ वर्षांखालील वर्ल्डकप विजेता भारतीय संघ

भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला क्रिकेटपटू स्मित पटेलने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो आता अमेरिकेत जाऊन क्रिकेट खेळणार आहे. स्मित पटेलने बीसीसीआयला आपल्या निवृत्तीचे पत्र पाठवले असून यात त्याने भारतासाठी क्रिकेट खेळण्याचा पाठ पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. स्मित २०१२ला झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. पटेलने अंतिम सामन्यात नाबाद ६२ धावा फटकावल्या आणि कर्णधार उन्मुक्त चंद याच्याबरोबर शतकी भागीदारी केली, ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला सहा गडी राखून पराभूत केले.

भारताबाहेर क्रिकेट खेळण्यासाठी २८ वर्षीय स्मितने आपला निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार, निवृत्ती न घेता कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला विदेशात क्रिकेट लीग खेळता येत नाही. त्यामुळे स्मितने मोठे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा – ‘‘टीम इंडियाच्या कामगिरीचं श्रेय एकट्या रवी शांस्त्रींना कसं देता येईल?”

 

स्मितला अमेरिकेत घडवायचीय क्रिकेट कारकीर्द

स्मितला अमेरिकेत जाऊन आपली क्रिकेट कारकीर्द पुन्हा घडवायची आहे. या कारणास्तव, त्याने भारतीय क्रिकेटपासून स्वत: ला वेगळे करण्याचा निर्णय घेतला. स्मित आपल्या घरगुती क्रिकेटमध्ये गुजरात, गोवा आणि त्रिपुरा आणि बडोदाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला आहे. पटेलने २८ टी-२० सामन्यात चार अर्धशतकांच्या मदतीने ७०८ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने २४ बळीही घेतले आहेत.

हेही वाचा – VIDEO : काऊंटी क्रिकेटचा धोनी..! चित्याच्या गतीनं यष्टीरक्षकानं केलं फलंदाजाला बाद

सीपीएलमध्ये खेळणार स्मित

याशिवाय, स्मित कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) बार्बाडोस ट्रायडंट्सकडून खेळताना दिसणार आहे. सीपीएल २०२१मध्ये ३३ सामने खेळले जातील आणि सर्व सामने सेंट किट्स आणि नेव्हिसमधील वॉर्नर पार्क येथे खेळले जातील. सीपीएलच्या सहा संघांनी त्यांच्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या वेळी या स्पर्धेत १०१ खेळाडू खेळताना दिसतील. काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर पहिल्यांदा सीपीएलमध्ये भाग घेईल. तोसुद्धा बार्बाडोस ट्रायडंट्सकडून खेळताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 6:18 pm

Web Title: team indias under 19 world cup winner smit patel quits bcci system to pursue american dream adn 96
Next Stories
1 ‘‘टीम इंडियाच्या कामगिरीचं श्रेय एकट्या रवी शांस्त्रींना कसं देता येईल?”
2 VIDEO : काऊंटी क्रिकेटचा धोनी..! चित्याच्या गतीनं यष्टीरक्षकानं केलं फलंदाजाला बाद
3 जगातील दुसऱ्या नंबरच्या महिला टेनिसपटूला बसला १५,००० डॉलर्सचा दंड!
Just Now!
X