29 October 2020

News Flash

निवृत्तीची चर्चा सोडा, धोनीसाठी निवड समितीने आखली खास योजना ! जाणून घ्या…

विंडीज दौऱ्यात धोनीची संघात निवड नाही

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चांना उधाण आलं आहे. प्रत्येक दिवशी धोनीच्या निवृत्तीबद्दल अनेक बातम्या समोर येत आहेत, मात्र धोनीने अद्याप आपल्या निवृत्तीबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाहीये. IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने धोनीला इतक्यात निवृत्तीचा निर्णय घेऊ नये असं सांगितल्याचं कळतंय. धोनीसाठी आगामी काळात संघ व्यवस्थापन नवीन योजना आखल्याचं समजतंय.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ व्यवस्थापन ऋषभ पंतला आगामी मालिकांसाठी तयार करण्याच्या विचारात आहे. २०२० साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी ऋषभ पंत हा भारतीय संघासाठी यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असणार आहे. या काळात धोनीने ऋषभ पंतचा मार्गदर्शक म्हणून काम पहावं अशी विनंती व्यवस्थापनाने धोनीला केली आहे. याचदरम्यान पंतला काही दुखापत झाल्यास, धोनी त्याला पर्यायी खेळाडू म्हणून संघात हजर असेल.

“जर ऋषभ पंत मध्येच दुखापतग्रस्त झाला, तर कोणाला संधी द्यायचची?? सध्याच्या घडीला एकही खेळाडू असा नाहीये, की जो धोनीच्या जवळपास जाऊ शकेल. ऋषभ पंत यापुढे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असणार आहे, मात्र त्याला धोनीचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे.” नाव न घेण्याच्या अटीवर सुत्राने माहिती दिली. दरम्यान ३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या विंडीज दौऱ्यासाठी महेंद्रसिंह धोनीची संघात निवड करण्यात आलेली नाहीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 1:58 pm

Web Title: team management ask ms dhoni not to retire early reported ians psd 91
Next Stories
1 T20 विश्वचषक : तिकीट विक्रीसंदर्भात ICC ची महत्वाची घोषणा
2 IND vs WI : विंडीजचा ‘धडाकेबाज’ संघ जाहीर; पोलार्ड, रसल, ब्रेथवेट संघात
3 ‘यॉर्कर किंग’ मलिंगा निवृत्तीनंतर श्रीलंका सोडणार
Just Now!
X