ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणा-या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज (रविवार) भारतीय संघाची निवड करण्यात आली.यावेळी भारतीय संघात हरभजन सिंगने पुनरागमन केले आहे. तर सुरेश रैना आणि गौतम गंभीरला संघातून वगळण्यात आले आहे. शिखर धवनला यावेळी संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्यांतील चांगल्या कामगिरीमुळे भुवनेश्वर कुमार याला कसोटी पदार्पणाची संधी मिळणार आहे. आज सकाळी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघनिवडीची बैठक झाली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांत भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते त्यामुळे संदीप पाटील यांच्या समोर यावेळी संघनिवडीचे आव्हान होते. त्यानुसार निवडसमितीने संघात बदल केले आहेत. रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणा-या शिखर धवनला सलामीच्या स्थानासाठी संधी देण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध आँस्ट्रेलिया पहीला कसोटी सामना रंगणार आहे.

भारतीय संघ –  
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन, मुरली विजय, अजिंक्‍य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रवींद्र जडेजा, हरभजनसिंग, आर. अश्‍विन, भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा, ईशांत शर्मा, प्रग्यान ओझा.