News Flash

मलेशियन ग्रां. प्रि. शर्यतीवर दु:खाचे सावट

मलेशिया विमान दुर्घटनेत तब्बल २३९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. हे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारपासून होणाऱ्या मलेशियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीवर या दु:खाचे सावट

| March 27, 2014 06:54 am

मलेशिया विमान दुर्घटनेत तब्बल २३९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. हे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारपासून होणाऱ्या मलेशियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीवर या दु:खाचे सावट असणार आहे. स्पर्धेच्या १५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दु:खाच्या सावटाखाली ही शर्यत आयोजित करावी लागत आहे.
गतविजेत्या रेड बुलने माघार घेण्याची दिलेली धमकी तसेच नव्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची गरज यामुळे आधीच या शर्यतीतील रंगत निघून गेली आहे. त्यातच मलेशिया एअरलाइन्सच्या एमएच-३७० या विमानाला झालेल्या अपघातामुळे २३९ जण मृत्युमुखी पडले होते. शर्यतीदरम्यान या सर्वाना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
सेपांग सर्किटचा ट्रॅक हा क्वालालंपूर विमानतळाच्या जवळच आहे. फॉम्र्युला-वन शर्यतीदरम्यान होणारा ख्रिस्तिना अॅग्युलेरा हिचा मनोरंजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सेपांग सर्किटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रझलान रझाली म्हणाले, ‘‘या दुर्घटनेमुळे ट्रॅकवर हजेरी लावणाऱ्यांची संख्या रोडावणार असली तरी याआधीेच शर्यतीची ३० टक्के तिकिटे विकली गेली आहेत. गेल्या आठवडय़ात फक्त ५० तिकिटे विकली गेली आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण एक हजार इतके होते. या दुर्घटनेचा परिणाम शर्यतीवर झाला आहे. आता काही तरी चमत्कार घडेल आणि तिकीट विक्री जोरात होईल, अशी अपेक्षा आम्हाला आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 6:54 am

Web Title: teams set to feel the heat in kuala lumpur
Next Stories
1 तन्वी, सौरभची आगेकूच अरुंधती, सायलीचे आव्हान संपुष्टात
2 भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी ज्यूड फेलिक्स
3 विंडीजपुढे बांगलादेश नतमस्तक!
Just Now!
X