News Flash

छातीवर चेंडू लागल्याने युवा क्रिकेटपटूचा मृत्यू

छातीवर चेंडू लागल्याने अठरा वर्षीय युवा क्रिकेटपटूचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे.

| January 27, 2015 02:13 am

ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू फिल ह्युजेससोबत झालेल्या दुर्देवी घटनेनंतर आता पाकिस्तानात क्रिकेटच्या मैदानावर दु:खद घटना घडली आहे. छातीवर चेंडू लागल्याने अठरा वर्षीय युवा क्रिकेटपटूचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानातील कराचीजवळील ओरांगी येथे क्लब क्रिकेट सामने सुरू असताना झिशान मोहम्मद या युवा क्रिकेटपटूच्या छातीवर चेंडू आदळला आणि झिशान खेळपट्टीवरच कोसळला. त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, रुग्णालयात पोहोचण्याआधीच झिशानचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याआधी काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या फिल ह्युजेस या युवा क्रिकेटपटूचा स्थानिक क्रिकेट सामन्यात बाऊंसरलागून मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2015 2:13 am

Web Title: teenage cricketer dies in pakistan after getting hit on chest
Next Stories
1 सायना, कश्यप अजिंक्य
2 सतपाल यांना पद्मभूषण
3 खो-खो खेळालाही ‘ग्लॅमर’ देण्याची गरज
Just Now!
X