भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी चक्क फुटबॉलच्या मैदानात उडी घेतली आहे. आयपीएलच्याच धर्तीवर इंडियन सुपर लीग नावाच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन यावर्षीपासून केले जाणार असून सचिन, सौरवसह सलमान खान, रणबीर कपूर आणि जॉन अब्राहम या अभिनेत्यांनीही या स्पर्धेतील संघांचे फँ्रचायझी हक्क मिळवले आहेत.  ही स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवली जाणार आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या मान्यतेने आयएमजी-रिलायन्स आणि स्टार इंडियाच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील दिग्गज फुटबॉलपटूंचा समावेश असेल. प्रत्येक संघात २२ खेळाडूंचा समावेश असेल. १० परदेशी, त्यापैकी एक आयकॉन खेळाडू, आठ भारतीय आणि चार स्थानिक खेळाडू संघात ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

देशातील खेळाडूंना आपले
कौशल्य विकसित करण्यासाठी सुपर लीग  व्यासपीठ म्हणजे सुवर्णसंधीच ठरणार आहे. युवा आणि फुटबॉलच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या खेळाडूंबरोबर संवाद साधणे हा वेगळाच अनुभव ठरणार आहे. कोची संघाचा सदस्य म्हणून फुटबॉलचा विकास करणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
सचिन तेंडुलकर