News Flash

रक्तद्रव दानासाठी सचिनची हाक

२७ मार्चला करोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर सचिनला सावधगिरीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

करोनातून सावरलेला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने शनिवारी चाहत्यांना रक्तद्रव (प्लाझ्मा) दान करण्याचे आवाहन केले. मी पात्र ठरल्यावर स्वत:ही करणार आहे, असे सचिनने सांगितले.

२७ मार्चला करोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर सचिनला सावधगिरीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ८ एप्रिलला घरी परतल्यानंतर तो घरीच विलगीकरणात आहे. सचिनने शनिवारी आपल्या ४८व्या वाढदिवसानिमित्त ‘ट्विटर’वर पोस्ट केलेल्या चित्रफितीत म्हटले की, ‘‘गतवर्षी मी एका रक्तद्रव दान केंद्राचे अनावरण केले. रक्तद्रव योग्य वेळी दिला गेला, तर रुग्ण लवकर बरा होईल,  असा संदेश या केंद्राने दिला होता. हाच संदेश मी तुम्हाला देतो आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:02 am

Web Title: tendulkar recovery from corona calls for plasma blood donation akp 94
Next Stories
1 RR vs KKR : राजस्थानचा कोलकातावर ‘हल्लाबोल’!
2 IPL 2021 : राजस्थानचा रियान पराग पुन्हा एकदा ‘हटके’ सेलिब्रेशनमुळे चर्चेत!
3 “करोनाच्या संकटात IPL?”, गिलख्रिस्टच्या ट्विटची सर्वत्र होतेय चर्चा
Just Now!
X