Video : सध्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा सुरु असून दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. जगभरात फुटबॉल फिव्हर असल्याचे दिसत आहे. विविध खेळाडूंना सामन्यात रेड कार्ड, पिवळे कार्ड दाखवले जात आहे. इतकेच नव्हे, तर सर्बियाच्या झाका आणि शकिरी या दोन खेळाडूंना आपल्या सेलिब्रेशनला राजकारणाचा ‘टच’ दिल्यामुळे फिफाने प्रत्येकी १० हजार फ्रँक (CHS) म्हणजेच ६ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हा आक्षेपार्ह कृत्यांचा आणि दंडाचा सिलसिला टेनिसमध्येही सुरु आहे. जागतिक टेनिस क्रमवारीत १९व्या स्थानी असलेला ऑस्ट्रेलियाचा स्टार टेनिसपटू निक कार्गीओस याला ‘एटीपी’ने सामन्यात आक्षेपार्ह कृत्य केल्याबद्दल तब्बल १५ हजार युरोचा (१२ लाखांचा) दंड ठोठावला आहे. क्वीन्स क्लब स्पर्धेत मरिन सिलीच याच्याविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात निक पराभूत झाला. त्या सामान्यांच्या वेळी त्याने हे आक्षेपार्ह कृत्य केले.

हा पहा व्हिडीओ –

निक हा एक ख्यातनाम टेनिसपटू असून त्याने ४ वेळा एटीपी स्पर्धांची विजेतेपदे पटकावली आहेत.