अनेकदा टेनिसपटू कोर्टवरील त्यांच्या वागणूकीमुळे चर्चेत असतात. अनेकदा हे खेळाडू आपल्या कृतीमधून वाहवा मिळवतात. मात्र फ्रान्समधील एक खेळाडू कोर्टवरील त्याच्या एका कृत्यामुळे टीकेचा धनी ठरला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान फ्रान्सच्या इलियट बेनकथ्रिटने कोर्टवरील बॉल गर्लबरोबर केलेली वर्तवणूक सध्या चर्चेत आहे.

झालं असं की सामन्यादरम्यान विश्रांतीच्या वेळेत इलियट आपल्या जागी जाऊन बसला. त्यावेळी तेथे उभ्या असणाऱ्या बॉल गर्लला स्वत: जवळ बोलवले. त्यानंतर त्याने तिला केळं सोलून देण्यास सांगितलं. त्यानंतर या बॉल गर्लने नेटजवळ बसलेल्या जॉन ब्लॉम या पंचांकडे पाहत काय करु असं विचारलं. त्यावेळी पंचांनी इलियटलाच केळं सोलून घेण्यास सांगितलं.

हा सर्व प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर इलियटवर अनेकांनी टीका केली आहे. तर दुसरीकडे पंच जॉन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. ती मुलगी बॉल गर्ल असून इलियटची नोकर नाही अशी टीकाही काही जणांनी केली आहे.

पुढच्या सामन्याला जाऊन

ती नोकर नाही

फ्रान्समधील वेडा

त्यांच्या तोंडावर चेंडू फेकून मारा

पंचांचे कौतुक

यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार

नकारात्मक परिणाम होईल

कसं वागवतात

हे थांबवा

इलियटचे स्पष्टीकरण…

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याच्यावरुन वाद निर्माण झाला. अनेकांनी टीका केल्यावर इलियटने अखेर यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. “माझ्या हाताला आणि बोटांना बॅण्डेड असल्याने मला केळं सोलता येत नव्हतं. म्हणून मी बॉल गर्लला केळं सोलून देण्यास सांगितलं,” असं इलियटने स्पष्ट केलं आहे.