Rafael Nadal won French Open title. ‘क्ले कोर्ट’चा अनभिज्ञ बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेनिसपटू राफेल नदालने पुन्हा एकदा या विश्वात त्याचं वर्चस्व सिद्ध केलं. रविवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नदालने विजय मिळवला. ऑस्ट्रीयाच्या डॉमिनिक थिमला त्याने सरळ तीन सेटमध्ये पराभूत करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेवर असणारं प्रभुत्व सिद्ध केलं.

अंतिम सामन्याच्या तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये नदालने त्याच्या फिजिओला बोलावलं होतं. मनगटाच्या दुखापतीचा त्रास होत असल्यामुळे त्याने फिजिओला बोलावलेलं. खुद्द नदालनेही आपल्या मनगटाला त्रास होत असल्याचं सांगितलं होतं. पण, स्पर्धेच्या नियमावलीनुसार कोणत्याही खेळाडूला कोर्टवर असतेवेळी क्रॅम्पसाठी उपचार घेण्याची परवानगी नाही. हीच बाब काही वरिष्ठ टेनिस खेळाडूंनी निदर्शनास आणून दिली आणि क्रीडाविश्वात नदालकडून उल्लंघन झालेल्या या नियमांचीच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.

माजी टेनिसपटू ग्रेग रसेद्स्की Greg Rusedski आणि अॅनाबेल क्रॉफ्ट Annabel Croft यांनी सामन्याशी संबंधित अधिकाऱ्यांकडे नदालला उपचारासाठीची परवानगी कशी देण्यात आली, याविषयीची विचारणा केली.

हे नियमबाह्य आहे, असं म्हणत रसेद्स्की यांनी ‘युरोस्पोर्ट’कडे याविषयीची खंत व्यक्त केली. सामना थांबवत मध्येच त्याने मेडीकल टाइम आऊट घेत उपचार करुन घेतला. पण, क्रॅम्पवर त्याने अशा प्रकारचा उपचार घेण्याची परवानगीच नाहीये. असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी रॉबिन हास आणि डेव्हिड गॉफिन यांच्यात झालेल्या सामन्याचा प्रसंगाचा संदर्भ जोडला. ज्या सामन्यात उपचार घेण्यात नकार देण्यात आला होता.

वाचा : FIFA World Cup 2018 Couple Goals: ‘हे’ फुटबॉलप्रेमी दाम्पत्य दहावा वर्ल्डकप पाहण्यासाठी सज्ज, पण…

हाच मुद्दा उचलून धरत क्रॉफ्ट यांनीही नदालला त्याच्या क्रॅम्पवर उपचार मिळाल्याचं पाहून आपल्याला धक्काच बसल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता क्रीडाविश्वात याविषयीच्या बऱ्याच चर्चांना उधाण आलं असून, अनेकांनीच त्याविषयी मतप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.