News Flash

टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विट केला बाळाचा पहिला फोटो

जगाला हॅलो म्हण बाळा! असे वाक्य पोस्ट करत सानियाने बाळाचा फोटो ट्विट केला आहे

टेनिसपटू सानिया मिर्झाने तिच्या बाळाचा पहिला फोटो ट्विटरवर ट्विट केला आहे. टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू शोएब मलिक यांना ३० ऑक्टोबरला पुत्ररत्न झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सानियाने पहिल्यांदाच मुलाचा फोटो शेअर केला आहे. शोएब मलिकने मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सानियाने मुलाला घेतलेला एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण या मुलाचे नाव इजहान आहे हे त्याच्या ब्लँकेटवरून समजले होते. आता मुलाचा चेहरा दाखवणारा एक फोटो सानिया मिर्झाने पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर सानियाने फोटो ट्विट करताच त्याला २६ हजाराच्यावर लाइक्स मिळाले आणि सुमारे १ हजार पेक्षा जास्त क्रीडाप्रेमींनी हा फोटो रिट्विट केला आहे.  अनेकांनी सानियाला शुभेच्छा दिल्या. २०१० मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा विवाह झाला. त्यांना तब्बल आठ वर्षांनी मूल झाले. बाळाचे नाव या दोघांनीही इजहान मिर्झा मलिक असे ठेवले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 8:17 pm

Web Title: tennis player sania mirza tweets her babys first photo on twitter
Next Stories
1 IND vs AUS : विराट कोहली वाघ, त्याला पिंजऱ्यात कैद करु नका !
2 IND vs AUS : विराट कोहली भारतीय संघाचा उर्जास्त्रोत !
3 IND vs AUS : विराटच्या नेतृत्वाखाली भारत जशास तसं उत्तर द्यायला शिकलाय – सर व्हिविअन रिचर्ड्स
Just Now!
X