सानिया मिर्झा आणि कारा ब्लॅक या पाचव्या मानांकित जोडीने डब्ल्यूटीए पॅरिबस खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. सानिया-कारा जोडीने रचेल कोप्स-जोन्स आणि अबिगैल स्पिअर्स जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव करत आगेकूच केली. सानिया-कारा जोडीने एक तास १२ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात अमेरिकेच्या जोडीचा ६-३, ६-४ असा सहज पाडाव केला. सानिया-कारा जोडीने आठपैकी पाच ब्रेकपॉइंट्स वाचवत नऊपैकी पाच ब्रेकपॉइंट्स आपल्याकडे वळवले. या मोसमात सानिया-कारा जोडीची मजल उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच मर्यादित राहिली आहे. त्यांना या मोसमात चार वेळा उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 4:56 am