News Flash

कसोटी सामने म्हणजेच परिपूर्ण क्रिकेट -बावणे

‘रणजी व प्रथम दर्जाच्या अन्य सामन्यांमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच मला भारत ‘अ’ संघात स्थान मिळाले आहे

Ankit Bawne
महाराष्ट्राचा सलामीचा फलंदाज अंकित बावणे

‘‘मर्यादित षटकांच्या तुलनेत कसोटी सामन्यांमध्ये कोणत्याही खेळाडूच्या सर्वकष कौशल्याची परीक्षाच असते आणि अशा परीक्षा द्यायला मला आवडतात. भारत ‘अ’ संघाकडून मला दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याचा फायदा मला भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळविण्यासाठी होईल,’’ असे महाराष्ट्राचा सलामीचा फलंदाज अंकित बावणेने सांगितले.

भारत ‘अ’ संघ ऑगस्टमध्ये आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात चार दिवसांच्या दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. अंकितने गतवर्षी रणजी स्पर्धेत दिल्लीविरुद्ध स्वप्निल गुगळेच्या साथीने ५९४ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. त्याने आतापर्यंत प्रथम दर्जाच्या ६९ सामन्यांमध्ये ४,६८८ धावा केल्या आहेत.

‘‘रणजी व प्रथम दर्जाच्या अन्य सामन्यांमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच मला भारत ‘अ’ संघात स्थान मिळाले आहे. रणजी सामने चार दिवसांचे असतात व गेली आठ वर्षे मी हे सामने खेळत असल्यामुळे कसोटी सामने माझ्यासाठी नवीन नाहीत. आफ्रिकेतील खेळपट्टय़ा द्रुतगती गोलंदाजांना अनुकूल असणार आहेत. मी आयपीएल व रणजी स्पर्धासह अनेक सामने अशा खेळपट्टय़ांवर खेळलो असल्यामुळे तेथे मला अडचण येणार नाही. अशा सामन्यांमध्ये प्रत्येक खेळाडूच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, क्रिकेटचे परिपूर्ण कौशल्य आदी अनेक गोष्टी पणास लागत असतात. कसोटी सामने हा क्रिकेटचा आत्माच आहे,’’ असे अंकितने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2017 2:29 am

Web Title: test cricket is the perfect cricket says ankit bawne
Next Stories
1 भारत आणि पाकिस्तानचा सामना फिक्स? चौकशी करा-आठवले
2 आनंदी ‘आनंद’ ! मलेशिया ऑलिम्पिकमध्ये भारताची विजयी सलामी
3 सर जाडेजा ‘अॅप’ले होणार
Just Now!
X