पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून यष्टीरक्षक दिनेश रामदिनच्या जागी कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा उदयोन्मुख खेळाडू जेसॉन होल्डरकडे सोपवण्यात आली आहे. कसोटी संघाचे १५ महिने कर्णधारपद सांभाळणाऱ्या रामदिनच्या जागी एकदिवसीय कर्णधार होल्डरची निर्विवादपणे निवड झाली आहे. होल्डरने फक्त आठ कसोटी सामन्यांत विंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे. १४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सलामीचा फलंदाज क्रेग ब्रेथवेटकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. वेस्ट इंडिजचा संघ : जेसॉन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट (उपकर्णधार), देवेंद्र बिशू, जर्मिने ब्लॅकवूड, कार्लस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, राजिंद्र चंद्रिका, शेन डॉवरिच, शेनॉन गॅब्रिएल, शाय होप, दिनेश रामदिन, केमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, जेरॉम टेलर, जोमेल वॉरिकन.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2015 2:32 am