02 March 2021

News Flash

थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सात्त्विकसाईराजला उपांत्य फेरीत ‘दुहेरी’ धक्का!

सात्त्विकसाईराज आणि अश्विनी पोनप्पा या मिश्र दुहेरी जोडीने उपांत्य फेरीत कडवी लढत दिली

टोक्यो ऑलिम्पिकच्या पदकाच्या शर्यतीत असलेल्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी याला पुरुष आणि मिश्र दुहेरीत पराभव पत्करावा लागल्याने भारताचे थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या सात्त्विकसाईराज तसेच चिराग शेट्टी या जोडीला उपांत्य फेरीत नवव्या क्रमांकावरील आरोन चिया आणि सोह वूइ यिक या मलेशियाच्या जोडीने १८-२१, १८-२१ असे नमवले.

सात्त्विकसाईराज आणि अश्विनी पोनप्पा या मिश्र दुहेरी जोडीने उपांत्य फेरीत कडवी लढत दिली, पण त्यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. थायलंडच्या अग्रमानांकित देचापोल पुवारानुक्रोह आणि सापसिरी ताएरात्रानाचाय या जोडीने सात्त्विक-अश्विनी यांना २२-२०, १८-२१, २१-१२ असे हरवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 1:18 am

Web Title: thailand open badminton tournament akp 94
Next Stories
1 वृत्ती, पुनरावृत्ती आणि संस्कृती
2 IND vs AUS: ३६ वर संघ बाद झाल्यानंतर डोक्यात काय विचार होता? रविंद्र जाडेजा म्हणतो…
3 ‘टीम इंडिया’वर चाल करून येण्याआधी अँडरसनचा श्रीलंकेत कहर
Just Now!
X