बँकॉक : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनच्या पुनरागमनाच्या सामन्यात जगज्जेती पी. व्ही. सिंधू हिला थायलंड खुल्या स्पर्धेच्या सलामीलाच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सिंधूसह बी. साईप्रणीत यांचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.
सहाव्या मानांकित सिंधूला डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड हिने २१-१६, २४-२६, १३-२१ असे पराभूत केले. पुरुष एकेरीत, साईप्रणीतला थायलंडच्या कँटाफोन वँगचारोएन याच्याकडून हार पत्करावी लागली. वँगचारोएनने साईप्रणीतला २१-१६, २१-१० असे हरवले.
सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या मिश्र दुहेरी जोडीने इंडोनेशियाच्या हाफिझ फैझल आणि ग्लोरिया विदजाजा जोडीवर २१-११, २७-२९, २१-१६ अशी मात केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 2:23 am