24 January 2020

News Flash

थायलंडचा विश्वविक्रम; ऑस्ट्रेलिया-इंग्लंडला ‘दे धक्का’

चौरंगी मालिकेत केली ऐतिहासिक कामगिरी

क्रिकेट खेळणारे देश कोणते असा प्रश्न विचारला तर कोणीही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड हीच नावे सांगतात. पण क्रिकेट प्रेमींच्या खिजगणतीतही नसलेल्या थायलंडच्या संघाने एक भीमपराक्रम करून दाखवला आहे. थायलंडच्या महिला संघाने टी २० इतिहासात सलग १७ सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या चौरंगी मालिकेत थायलंडने यजमान संघाला ५४ धावांत गुंडाळले आणि ८ षटकात सामना खिशात घालत विश्वविक्रम रचला.

थायलंड, नेदरलँड्स, आयर्लंड आणि स्कॉटलंड या चार संघांमध्ये ही चौरंगी मालिका सुरू आहे. या मालिकेत थायलंड महिला संघाने दमदार कामगिरी करत विश्वविक्रम आपल्या नावे केला. या आधी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने मार्च २०१४ ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत एकूण सलग १६ सामने जिंकून विश्वविक्रम रचला होता. तो विक्रम थायलंड महिला संघाने मोडीत काढला.

टी २० क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत ५ संघांनी सलग १० पेक्षा अधिक सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंड आणि झिम्बाव्बे महिला संघाने सलग १४ सामने जिंकले होते, तर न्यूझीलंडने सलग १२ सामन्यात यश मिळवले होते. तसेच ऑस्ट्रेलियाने देखील सलग १२ सामने जिंकले होते.

दरम्यान, झिम्बाव्बेच्या संघाची सलग १४ सामने जिंकल्याची घोडदौड अजूनही सुरू आहे. त्यामुळे थायलंडच्या संघाचा विश्वविक्रम मोडण्याची संधी झिम्बाब्वेला आहे.

First Published on August 13, 2019 2:22 pm

Web Title: thailand women cricket team world record most consecutive wins 17 matches breaking australia team record vjb 91
Next Stories
1 पुराचं पाणीही त्याला थांबवू शकलं नाही, वाचा बेळगावच्या मराठमोळ्या बॉक्सरची यशोगाथा
2 मला निवड समितीचा सदस्य व्हायचंय, कोण संधी देईल? विरुचं खोचक ट्विट
3 विंडीज दौऱ्यात विराटला भेटला खास चाहता, म्हणाला पुढचा विश्वचषक नक्की जिंक
Just Now!
X