News Flash

Dhoni is back… CSK ने पोस्ट केला खास व्हिडीओ

पाहा धोनी करतोय तरी काय?

टीम इंडियाचे २०१९ विश्वचषक स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ खेळी हा चर्चेचा विषय होता. यानंतर निवड समितीने धोनीशी चर्चा करून त्याला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. मध्यंतरीच्या काळात धोनीला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळावं, अशी मागणी सोशल मीडियामधून होत होती, पण ते शक्य झालं नाही. अशा परिस्थितीत IPL मध्ये आपली चमक दाखवून धोनी संघात पुनरागमन करेल, असा चाहत्यांना विश्वास होता, पण दुर्दैवाने IPL स्पर्धा करोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे सध्या धोनी आपल्या फार्म हाऊसवर आपली पत्नी साक्षी आणि झिवा यांच्यासोबत वेळ घालवतो आहे.

…मग कशाला गेलात न्यूझीलंडमध्ये ‘वन-डे’ खेळायला? नेहरा विराटवर संतापला

धोनी अनेक महिने क्रिकेटपासून दूर जरी असला, तरी त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. धोनीला पुन्हा एकदा IPL मध्ये खेळताना पाहायची अनेकांची इच्छा आहे. पण सध्या तरी IPL अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्यामुळे ते शक्य नाही. काल IPL प्रेमींसाठी महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी हिने एक झकास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता CSK ने एक झकास व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये धोनी आपली मुलगी झिवा आणि कुत्रा यांच्यासोबत चेंडूने खेळताना दिसतो आहे. या व्हिडीओच्या कॅप्शमध्ये धोनी इज बॅक असं लिहिण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

#WhistlePodu VC: @sakshisingh_r @mahi7781

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

दरम्यान, करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाउन सुरूच ठेवले आहे. या काळात सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झालेल्या असल्यामुळे सर्व खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या आपल्या रांचीतल्या फार्महाऊसवर क्वारंटाइन झाला आहे. धोनीची पत्नी साक्षीने काही दिवसांपूर्वी आपल्या रांचीतल्या फार्महाउसचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. तसेच त्यानंतर लॉकडाउनच्या काळात धोनीची मुलगी झिवाला कंटाळा आल्यामुळे धोनीने तिला आपली बाईक काढत फार्महाउसची सफर घडवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 5:35 pm

Web Title: thala dhoni is back whistle podu watch csk special video vjb 91
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये रवी शास्त्री अडकले अलिबागमध्ये, म्हणाले आता मी बिअर पिऊ शकतो !
2 करोनावर औषध सापडल्यानंतरच क्रिकेटला सुरुवात होईल – अजिंक्य रहाणे
3 …मग कशाला गेलात न्यूझीलंडमध्ये ‘वन-डे’ खेळायला? नेहरा विराटवर संतापला
Just Now!
X