News Flash

IPL 2020 : तो परत आलाय ! चेन्नई सुपरकिंग्जने पोस्ट केला धोनीचा फोटो

धोनी १ मार्चपासून मैदानात सरावाला उतरणार

आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. २९ मार्चला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा प्रमुख खेळाडू महेंद्रसिंह धोनीही आगामी हंगामासाठी सज्ज झाला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने धोनीचा आयपीएलची नवी जाहीरात पाहतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

१ मार्चपासून धोनी सरावासाठी मैदानात उतरणार आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला आहे. एकीकडे धोनी निवृत्ती कधी स्विकारणार या चर्चांना उधाण आलेलं असतानाही त्याला आगामी टी-२० विश्वचषकात संधी मिळावी अशी चाहत्यांची मागणी आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी धोनीचं भारतीय संघातलं पुनरागमन हे आयपीएल हंगामावर अवलंबून असेल असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आगामी काळात धोनी आयपीएलमध्ये कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 7:41 am

Web Title: thala is back chennai super kings share ms dhonis picture watching new ipl ad psd 91
टॅग : Csk,IPL 2020,Ms Dhoni
Next Stories
1 Ind vs NZ : तो यातूनही मार्ग काढेल; मुंबईकर पृथ्वी शॉची विराटकडून पाठराखण
2 Ind vs NZ : कर्णधार विराट कोहलीने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण…
3 Ind vs NZ : भारताची डोकेदुखी ठरलेल्या जेमिसनचा फलंदाजीतला हा विक्रम माहिती आहे का??
Just Now!
X