04 June 2020

News Flash

ठाणे शहर पोलीस, मुंबई बंदर संघांची विजयी सलामी

महिला गटात होतकरू ठाणे संघाने पोयसर जिमखान्यावर ५३-३५ असा विजय मिळवला.

ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ठाणे कला-क्रीडा महोत्सव अंतर्गत ही स्पर्धा सुरू आहे.

ठाणे शहर पोलीस, मुंबई बंदर आणि बँक ऑफ इंडिया या संघांनी पुरुष व्यावसायिक गटाच्या राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पध्रेत विजयी सलामी दिली. ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ठाणे कला-क्रीडा महोत्सव अंतर्गत ही स्पर्धा सुरू आहे.
साठेवाडी क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पध्रेत ठाणे शहर पोलिसांनी कोल्हापूरच्या महाडिक उद्योग संघाचा १९-१३ असा पराभव केला. हरीश टावरे, प्रदीप टक्के हे या विजयात चमकले. मुंबई बंदरने दादा आव्हाड व मोबिन शेख यांच्या चढाया व पकडींच्या जोरावर सेंट्रल बँकेचा ३२-१७ असा धुव्वा उडविला. बँक ऑफ इंडियाने सर जे. जे. हॉस्पिटलवर ३१-१४ असा सहज विजय मिळवला. विनोद तावडे व अक्षय जाधव यांनी विजयात मोलाची भूमिका बजावली.
महिला गटात होतकरू ठाणे संघाने पोयसर जिमखान्यावर ५३-३५ असा विजय मिळवला. अद्वैत मांगले व सायली परुळेकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. डॉ. शिरोडकर संघाने ठाण्याच्या शिवतेज संघाचा ४८-१६ असा एकतर्फी पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2016 1:22 am

Web Title: thane city police mumbai port teams won their opening matches
टॅग Kabaddi
Next Stories
1 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा : ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिलांचा १०१ धावांनी पराभव
2 ..तरीही कश्यपचा भारतीय बॅडमिंटन संघात समावेश
3 ‘झिका’मुळे गर्भवती खेळाडूंनी ऑलिम्पिक टाळावे
Just Now!
X