25 January 2021

News Flash

ठाणे, पुणे, नाशिक संघांची उपांत्य फेरीत धडक

किशोरी गटातील उपांत्यपूर्व सामन्यात, उस्मानाबादने ठाण्याचा १५-१३ असा दीड मिनिटे राखून दोन गुणांनी पराभव केला

(संग्रहित छायाचित्र)

राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने धुळे येथे सुरू असलेल्या ३६व्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत उस्मानाबाद आणि पुण्याच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली असून किशोरांमध्ये ठाणे तसेच किशोरींमध्ये नाशिक संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

किशोरी गटातील उपांत्यपूर्व सामन्यात, उस्मानाबादने ठाण्याचा १५-१३ असा दीड मिनिटे राखून दोन गुणांनी पराभव केला. उस्मानाबादच्या निशा वसावे (१:२०, १:२०मि. संरक्षण व ३ बळी) हिने चांगला खेळ केला. ठाण्याच्या दिव्या गायकवाड (२:३० मि. संरक्षण), प्रीती हलगरे (१:४०मि. संरक्षण व ४ बळी) यांचा प्रतिकार कमी पडला. सोलापूरने साताऱ्याचा १०-६ असा एक डाव आणि ४ गुणांनी धुव्वा उडवला. सोलापूरच्या प्रणाली काळेने दुसऱ्या डावात ४:०० मि. संरक्षण आणि एक बळी मिळवत छाप पाडली.

नाशिकाने सांगलीचा अतिशय चुरशीच्या सामन्यात १३-१२ असा पराभव केला. त्यात नाशिकच्या ललिता गोबाले (२:१०, २:५० मि. संरक्षण व ३ बळी) ज्योती मेढे (१:१०, १:५० मि. संरक्षण व १ बळी) यांनी उत्तम खेळ केला. पुण्याने बीडचा १४-४ असे एक डाव १० गुणांनी सहज हरवले. पुण्याकडून प्रांजली शेंडगे (३:४० मि. संरक्षण व १ बळी), दीपाली राठोड (२:२० मि. संरक्षण व ३ बळी) चमकल्या.

किशोरांच्या उपांत्यपूर्व सामन्यात, ठाण्याने मुंबई उपनगराचा १६-१४ असा पाडाव केला. ठाण्याच्या वैभव मोरे (२:१०, १:४० मि. संरक्षण व ५ गडी), मयुरेश मोरे (१:२०, १:२० मि. संरक्षण व २ गडी) यांनी विजयात योगदान दिले. मुंबई उपनगरकडून रामचंद्र झोरे (१:५०, १:१० मि. संरक्षण व २ गडी), सचिन पटेल (१:२० मि. संरक्षण व ३ गडी) यांनी चांगला खेळ केला. उस्मानाबादने नाशिकला १७-१५ असे हरवले. पुण्याने औरंगाबादचा १४-८ असा पराभव केला. पुण्याच्या रोशन कोळी (२:५०, मि. संरक्षण व २ गडी), ओंकार थोरात (२:२०, १:५० मि. संरक्षण) यांनी छाप पाडली. सांगलीने सोलापूरवर  १४-१२ अशी निसटती मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 1:11 am

Web Title: thane pune nashik teams beat semi finals kho kho open state tournament abn 97
Next Stories
1 World Boxing Championship : अमित पांघलला रौप्यपदक, अंतिम फेरीत पराभवाचा धक्का
2 भारताच्या दिपक पुनियाला टोकयो ऑलिम्पिकचे तिकिट
3 Video : ‘हा’ रनआऊट पाहिल्यावर तुम्हांला हसू नाही आवरणार…
Just Now!
X