06 July 2020

News Flash

लिलावातील बोलीच्या रकमेने भाच्यांच्या शिक्षणाला मदत होईल, प्रो-कबड्डीत महागडा खेळाडू ठरलेल्या दिपक हुडाची प्रांजळ कबुली

दिपकवर १ कोटी १५ लाखांची बोली

दीपक हुडा (संग्रहीत छायाचित्र)

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाच्या लिलावातील पहिल्या दिवशी, एकामागोमाग एक विक्रम मोडण्याचा सपाटा सुरुच आहे. सकाळच्या सत्रात फैजल अत्राचलीने १ कोटींची बोली घेत सर्वात महागडा खेळाडू बनण्याचा विक्रम केला होता. यानंतर संध्याकाळच्या सत्रात पुणेरी पलटणचा माजी कर्णधार दिपक हुडाने फैजलला मागे टाकत सर्वात महागडा खेळाडू बनण्याचा विक्रम आपल्या नावे जमा केला. यापाठोपाठ पाचव्या हंगामात ९३ लाखांची बोली लागलेल्या नितीन तोमरनेही अनपेक्षितरित्या दिपकच्या रकमेशी बरोबरी केली. पुणेरी पलटणने नितीन तोमरला १ कोटी १५ लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. त्यामुळे प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा मान दिपक हुडा आणि नितीन तोमर या दोन खेळाडूंनी पटकावला आहे. दिपकवर अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सने दिपकवर १ कोटी १५ लाखांची विक्रमी बोली लावली आहे. त्यामुळे यापुढचा हंगाम दिपक जयपूरच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.

सर्वात महागडा खेळाडू ठरल्यानंतर, दिपकने पत्रकारांशी संवाद साधला. आपल्यावर इतक्या मोठ्या रकमेची बोली लागल्यामुळे आनंद होत असल्याचं दिपक म्हणाला. याचसोबत पुढील हंगामात चांगला खेळ करुन दाखवण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचंही दिपकने प्रांजळपणे कबूल केलं. सर्वात महागडा खेळाडू ठरल्यानंतर, इतक्या मोठ्या रकमेचं करणारं काय असं विचारलं असता दिपकने प्रामाणिकपणे, हे पैसे आपल्या तिन्ही भाच्यांच्या शिक्षणासाठी वापरणार असल्याचं सांगितलं. दिपकच्या बहिणीची तिन्ही मुलं दिपककडे राहतात, त्यांच्या शिक्षणाची व पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावरच असल्यामुळे लिलावात मिळालेल्या या रकमेचा आपल्याला फायदाच होईल असं दिपक म्हणाला.

अवश्य वाचा – यू मुम्बा माझं दुसरं घर, विक्रमी बोलीनंतर फैजल अत्राचलीची थेट इराणवरुन प्रतिक्रीया

गेले ३ हंगाम दिपक हुडा पुणेरी पलटण संघाचं प्रतिनिधीत्व करत होता. गेल्या हंगामात दिपकने पुण्याच्या संघाचं नेतृत्वही केलं होतं, मात्र आपल्या संघाला अंतिम फेरीत नेण्यात तो अपयशी ठरला होता. गेले ३ वर्ष पुण्याने मला जे प्रेम दिलं ते कधीच विसरता येणार नाही. पुण्याच्या लोकांची मला नेहमी आठवण येईल असं म्हणत दिपकने सर्व पुणेकरांचे आभार मानले. त्यामुळे आगामी हंगामात दिपक जयपूरच्या संघाकडून कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2018 8:45 pm

Web Title: the auction money will help for my nice education says most expensive man in pro kabaddi deepak huda
Next Stories
1 सुवर्णपदक विजेता भारतीय थाळीफेकपटू विकास गौडा निवृत्त
2 यू मुम्बा माझं दुसरं घर, विक्रमी बोलीनंतर फैजल अत्राचलीची थेट इराणवरुन प्रतिक्रीया
3 मराठमोळ्या निलेश शिंदेला प्रो-कबड्डी लिलावामधून वगळलं, मारहाणीच्या गुन्ह्यातला सहभाग भोवल्याची शक्यता
Just Now!
X