अहमदाबादमधील सॅटेलाईट परिसरातून अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विनोद मुलचंदानी या सट्टेबाजाला अटक केली आहे. त्याच्या कडून सुमारे एक कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील सट्टेबाजांशी संपर्क असल्याच्या संशयावरून विनोद मुलचंदानी याच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी त्याच्या घरातून सुमोर एक कोटी रुपये रोख, लॅपटॉप आणि मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहेत. आयपीएल मधील सामन्यांवर तो सट्टा लावत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावरून पोलिसांमार्फत देशभरातील अनेक शहरांमध्ये छापे टाकण्यात येत आहेत. विनोद मुलचंदानी याचा आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आणखी कोणाशी संपर्क आहे का? याचा शोध आता पोलिस घेत आहेत.