News Flash

Euro Cup 2020 : डेन्मार्कचा फुटबॉलपटू मैदानात कोसळल्याने सामना स्थगित

ख्रिश्चियन एरिक्सन खाली कोसळल्यानंतर डेन्मार्कच्या खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली.

(फोटो सौजन्य - Reuter )

युरो कप २०२०मध्ये डेन्मार्क विरुद्ध फिनलँड यांच्यात सामना सुरु असताना एक धक्कादायक घटना घडली. डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन मैदानात कोसळल्यानंतर सामना स्थगित करण्यात आला. हा प्रसंग घडला तेव्हा पहिला सत्रातील खेळ संपला होता. पहिल्या गोल करण्यासाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंची धडपड सुरू होती. मात्र पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करता आला नाही. या दरम्यान मात्र अचानक ख्रिश्चियन एरिक्सन मैदानात कोसळला. तो मैदानात पडल्याचे पाहताच डेन्मार्कच्या  खेळाडूंनी त्याच्याजवळ धाव घेतली. तेव्हा बेशुद्ध अवस्थेत असलेल्या ख्रिश्चियनभोवती रिंगण करुन ते उभे राहिले आणि त्याला धीर देत होते.

 

 

या घटनेनंतर वैद्यकीय टीम तिथे पोहोचली आणि त्यांनी ख्रिश्चियनला तपासले. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रसंगानंतर यूरो कप समितीने हा सामना स्थगित केला. या घटनेमुळे संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. फुटबॉल चाहतेही तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करताना दिसले.

 

दरम्यान डेन्मार्कची पहिल्या सत्रात पकड दिसली. जास्तीत जास्त वेळ फुटबॉल स्वत:जवळ ठेवण्यात त्यांना यश आले. २३२ वेळा त्यांनी आपल्या खेळाडूंकडे फुटबॉल पास केला. तर फिनलँडच्या संघाने १४१ वेळा फुटबॉल पास केला. डेन्मार्कच्या संघाला ६ कॉर्नर शूटआउट मिळाले. मात्र या संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यास त्यांना अपयश आले.

साधारणपणे दर चार वर्षांनी खेळली जाणारी ही स्पर्धा गतवर्षी होणे अपेक्षित होते. परंतु करोना साथीच्या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्र ठप्प पडल्यामुळे २०२१मध्ये युरो कप खेळवण्याचे ठरवण्यात आले. त्यातच प्रेक्षकांनाही मर्यादित संख्येत स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या तणावापूर्ण वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर किमान पुढील एक महिना तरी क्रीडाप्रेमींना फुटबॉलचा रोमांच अनुभवायला मिळणार आहे. ११ जून ते ११ जुलै दरम्यान एकूण २४ संघांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला ‘फिफा’ विश्वचषकाप्रमाणेच महत्त्व आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 11:01 pm

Web Title: the denmark vs finland euro 2020 match was suspended after midfielder christian eriksen collapsed adn 96
Next Stories
1 फ्रेंच ओपन : तब्बल ४० वर्षांनंतर चेक प्रजासत्ताकच्या महिलेने पटकावले जेतेपद!
2 मुरेच्या गोलमुळं वेल्सचं कमबॅक, स्वित्झर्लंडविरुद्धचा सामना सुटला बरोबरीत
3 Euro Cup 2020 : डेन्मार्कचा फुटबॉलपटू मैदानात कोसळला, फिनलँडविरुद्धचा सामना स्थगित
Just Now!
X