South Africa vs England : यजमान दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये चार डिसेंबर रोजी पहिला एकदिवसीय सामना होणार होता. मात्र, सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा एका खेळाडूचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे सामना रद्द करण्यात आला होता. ४ तारखेला रद्द करण्यात आलेला सामना, आज रविवारी केपटाउनमध्ये होणार होता. मात्र, पुन्हा एकदा सामन्याआधीच करोनाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे सामना पुन्हा रद्द करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघातील खेळाडू थांबलेल्या हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांचा करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्ड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच सामना थोडा उशीरानं सुरु करण्याबाबत एकमत झालं. मात्र, थोड्यावेळानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयसीसीनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली.


हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली. याआधी इंग्लंड संघातील खेळाडू आणि आणि टीम मॅनेजमेंटची शनिवारी सामन्यापूर्वी पीसीआर टेस्ट झाली होती. याचा रिपोर्टही अद्याप आलेला नाही. त्यामुळे सामना उशीरानं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला.