भारतीय महिला संघाची कर्णधार मितालीचा निर्धार

आगामी ट्वेन्टी-२० महिला विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणे, हे पहिले लक्ष्य असल्याचे मत भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केले. बंगळुरू येथे ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे बुधवारी अनावरण करण्यात आले. त्या वेळी मिताली म्हणाली, ‘‘उपांत्य फेरीची पात्रता मिळवण्याचे पहिले लक्ष्य आहे, परंतु गट साखळीतील प्रत्येक सामना बाद फेरीचा असल्यासारखे आम्ही खेळणार आहोत.’’

विश्वचषकात भारतीय संघ सातत्यपूर्ण कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करत मी म्हणाली,  ‘‘ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका संघासाठी यशस्वी होती. विश्वचषकापूर्वीच्या या विजयाने संघाचे मनोबल उंचावले आहे. संघ ज्या विकासाच्या टप्प्यात आहे, ते पाहता उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात काहीच अडचण येणार नाही.’’