‘फ्लाइंग सिख’ या टोपणनावाने गौरवले जाणारे मिल्खा सिंग यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया…

  • त्यांचा जन्म १९२९ साली पंजाब प्रांतातील मुझ्झफरगढ या ठिकाणी झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मुझफरगढ हे ठिकाण पाकिस्तानचा भाग म्हणून घोषित करण्यात आलं.

 

  • ‘फ्लाईंग सिख’ या टोपण नावाने ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंग यांनी १९६० (रोम) व १९६४ (टोकियो) साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

 

  • मिल्खा सिंग यांनी कुठल्याही सरावाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटरचं अंतर केवळ ४५.९ सेकंदात पार केलं होतं. त्यांचा विक्रम अद्याप कोणत्याही भारतीयाला मोडता आलेला नाही.

 

  • पटियाला येथे १९५६ साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ते पहिल्यांदा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. २०० व ४०० मीटर शर्यंतीत त्यांनी विक्रमी वेळ नोंदवली होती.

 

  • १९५८ साली टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्यांनी आपली कामगिरी कायम ठेवत २०० व ४०० मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला.

 

  • ६ सप्टेंबर १९६० साली ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ४०० मीटर शर्यतीत चौथा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी ०.१ सेकंदानं त्यांचं कास्य पदक हुकलं होतं. त्या स्पर्धेत कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय ते धावले होते.

 

  • १९५८ साली झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांनी सुवर्णपदक मिळवलं होतं.

 

  • जिंकलेली सर्व पदकं, चषक, ब्लेझर व आपले विक्रमी बूट त्यांनी राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले.

 

  • त्या काळात मिल्खा सिंग हे देशभरातील तरूणांसाठी एक आदर्श व्यक्तीमत्व होते. अभुतपूर्वक कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.