भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन सोमवारी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरून संघाने इतिहास रचला आहे. तीन वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला एकाच गोलने पराभूत केले आहे. महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियावर १-० अशी मात करत या विजयासह इतिहासात प्रथमच संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. या विजयानंतर संघाचे अभिनंदन करताना गोलकीपर सविता पुनिया चर्चेत आहे.

टीम इंडियाची भिंत, द ग्रेट वॉल असे आतापर्यंत आत्तापर्यंत राहुल द्रविडला हाक मारली जाता होती पण आज पुन्हा याची चर्चा होत आहे. भारतातील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ’फेरेल यांनी भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करताना गोलकीपर सविता पुनियाला भारताची महान भिंत म्हटले आहे. सविता पुनियाने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ पेनल्टी कॉर्नर वाचवले आहेत.

भारतीय महिला हॉकी संघाची गोलकीपर सविता पुनियाने आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर भिंत म्हणून खंबीरपणे उभी राहिली आणि संघाला विजय मिळवून दिला. भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारतीय गोलकीपर सविता पुनियाने चेंडूला गोल पोस्टपासून दूर ठेवले. ऑस्ट्रेलियन संघाने अनेक वेळा आपली रणनीती बदलली. भारतीय संघाला फसवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ते गोलकीपरच्या पलीकडे जाऊ शकली नाही. सविता पुनिया विरोधी संघासमोर भिंत म्हणून उभी राहिली होती.

सविता पुनियाने ऑस्ट्रेलियाचे ७ पेनल्टी कॉर्नर रोखले आणि विरोधी संघ एकही गोल करू शकला नाही. शेवटच्या मिनिटालाही ऑस्ट्रेलियाला पेनल्टी मिळाला पण सविताने तोही अपयशी ठरवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आजच्या विजयात सविताचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होत आहे. आजच्या विजयानंतर, तिच्या गावी हरियाणामध्ये देखील आनंद साजरा केला जात आहे. सविता पुनिया ही भारतीय महिला हॉकी संघाची उपकर्णधार आहे.