21 January 2021

News Flash

‘त्या’ गोष्टीचा माझ्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप झाला – सुरेश रैना

रैनाने ट्विट करून दिली माहिती

भारताचा तडाखेबाज खेळाडू सुरेश रैना याच्या कारला जोरदार अपघात झाला असून त्यात तो गंभीर जखमी झाला असल्याचे वृत्त सोशल मीडियावर काही काळापासून फिरत आहे. काही अतिउत्साही युट्युब चॅनेल्सनी तर त्याचे निधन झाल्याचेही वृत्त दिले होते. या वृत्तामुळे बऱ्याच जणांना धक्का बसला. या साऱ्या गोष्टी खोट्या आणि चुकीच्या असल्याचे रैनाने स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपासून मी कर अपघातात गंभीर जखमी झाला असल्याचे खोटे वृत्त व्हायरल होत आहे. या चुकीच्या आणि खोट्या वृत्तामुळे माझ्या कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला खूप मनस्ताप भोगावा लागला आहे. कृपया असल्या बातम्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका, असे रैनाने ट्विट करून सांगितले आहे. ‘देवाच्या कृपेने मी अत्यंत ठणठणीत आणि सुखरूप आहे. ज्या युट्युब चॅनेल्सनी ती खोटी वृत्त पसरवली, त्याबद्दल युट्युबला report करण्यात आले आहे. त्या चॅनेल्सवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा आहे, असेही त्याने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून रैनाला भारताच्या संघात स्थान मिळालेले नाही. रैनाने आतापर्यंत २२६ एकदिवसीय सामन्यात ५ हजार ६१५ धावा केल्या आहेत. तर ७८ टी २० सामन्यांमध्ये १ हजार ६०५ धावा केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 5:17 pm

Web Title: the hoax news made my family and friends disturbed says suresh raina
Next Stories
1 इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात विंडीजचा किमो पॉल जखमी
2 Video : रोहित-रितिकाच्या चिमुकलीचं Cute Smile
3 ‘मुंबई रणजी क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेत अनियमितता’
Just Now!
X