आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हॉकीच्या पुरुषांच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद देण्यात आलं आहे. खरं तर या दोन्ही देशांमध्ये फायनल होणार होती. मात्र अंतिम सामना सुरु होण्याआधी पाऊस पडण्यास सुरुवात लागली. त्यामुळे दोन देशांमध्ये हा सामना होऊच शकला नाही. सामनाच होऊ शकला नाही, त्यामुळे दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद देण्यात आलं. हॉकी इंडियाने ट्विट करून या संदर्भातले वृत्त दिले आहे. अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना होऊ शकलेला नाही. त्यामुळे दोन्ही देशांना आम्ही संयुक्त विजेतेपद देतो आहोत असे हॉकी इंडियानं स्पष्ट केलं आहे.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीतील सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाने जपानवर ३-२ ने मात केली. या विजयासह भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम फेरीत धडक मारली . रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार होता मात्र पावसामुळे तो होऊ शकलेला नाही, म्हणूनच या दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले आहे.