News Flash

गावसकरांचं ‘ते’ वक्तव्य अतिशय खेदजनक – वॉन

काय म्हणाले होते सुनील गावसकर?

मोटेराच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून १० गडी राखून पराभव पत्करल्याने इंग्लंडचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पिछाडीवर पडला आहे. त्यानंतर दोन दिवसांत सामना संपवण्याची किमया साधणाऱ्या खेळपट्टीवर वॉनने ताशेरे ओढले. ‘‘भारतासारख्या सामर्थ्यवान राष्ट्राबाबत ‘आयसीसी’ मौन बाळगते. त्यामुळे कसोटी क्रिकेटचे मोठे नुकसान होते आहे. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर खेळपट्टीवर टीका करण्याऐवजी यशाचे श्रेय भारताच्या फिरकी गोलंदाजांना देतात, हे खेदजनक आहे,’’ असे वॉनने म्हटले आहे.

सामने कमी दिवसांत संपणार असतील, तर प्रक्षेपणकर्ते कराररकमेतून परतावा मागतील, असा इशारा २००३ ते २००८ या कालावधीत इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या वॉनने दिला आहे. ‘‘प्रक्षेपणकत्र्यांचे तीन दिवस रिक्त जात आहेत, परंतु तरीही निर्मितीचे पैसे त्यांनी मोजले आहेत. यापुढे अशा प्रकारच्या खराब खेळपट्ट्या तयार करणाऱ्या क्रिकेट मंडळांबाबत त्यांना पुनर्विचार करावा लागेल,’’ असे वॉनने म्हटले आहे.

काय म्हणाले होते सुनील गावसकर?
बरेचसे खेळाडू सरळ जाणाऱ्या चेंडूंवर बाद झाले. अतिबचावात्मक पवित्रा फलंदाजांना नडला. त्यामुळे खेळपट्टीला दोष देण्यापेक्षा विजयाचे श्रेय अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या भारताच्या फिरकीपटूंना जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 12:48 pm

Web Title: the pitch icc indian team cricket sunil gavaskar michael wan 3rd test nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 खेळपट्टीप्रकरणी वॉनकडून ‘आयसीसी’ची निर्भर्त्सना
2 विक्रमापेक्षा तंदुरुस्ती आणि कामगिरी उंचावण्याला प्राधान्य!
3 वैयक्तिक कारणास्तव बुमराची माघार
Just Now!
X