News Flash

बॅडमिंटन खेळाची नियमावली बदलणार?

२२ मे रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान हा नियम अमलात येण्याची शक्यता आहे.

बॅडमिंटन हा खेळ आता नव्या रूपात चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या खेळातील उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी जागतिक बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) नियमावलीत बदल करण्याची शक्यता आहे. इंडोनेशिया आणि मालदीव या दोन संघटनांनी केलेल्या शिफारशीनुसार आता नियमपुस्तिकेत बदल केले जाण्याची शक्यता आहे.

बॅडमिंटनचे सामने २१ गुणांचे खेळवले जातात. तीनपैकी दोन गेम जिंकणारा सामन्यात विजयी ठरत असे. पण आता या खेळातील रंगत वाढवण्यासाठी आणि दूरचित्रवाणीवर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी ११ गुणांचे पाच गेम खेळवण्यात येणार असल्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. २२ मे रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान हा नियम अमलात येण्याची शक्यता आहे.

‘‘बॅडमिंटन हा खेळ अधिक रंगतदार बनवण्यासाठी गुणांकन पद्धतीत बदल करण्याचे आधीपासूनच मनात होते. टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेनंतर हे बदल केले जाण्याचे प्रस्तावित आहे. या बदलाची हीच योग्य वेळ आहे,’’ अशी आशा ‘बीडब्ल्यूएफ’चे अध्यक्ष आणि १९९६च्या ऑलिम्पिकचे विजेते पाऊल-एरिक होयेर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 12:09 am

Web Title: the rules of the game of badminton will change akp 94
Next Stories
1 देशांतर्गत युवा क्रिकेट स्पर्धा जून-जुलैमध्ये
2 ..तरीही श्रेयस अय्यरला ‘आयपीएल’चे पूर्ण मानधन
3 कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत योगदानासाठी उत्सुक -उमेश
Just Now!
X