20 September 2020

News Flash

टीम इंडियासाठी आज करो या मरोची लढाई!

दोन्ही संघातली लढत चुरशीची होणार

भारत आणि दक्षिण अफ्रिका या दोन संघांदरम्यान आज तिसरा टी २० सामना होणार आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. कारण तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी एक एक सामना खिशात घातला आहे. दोन्हीपैकी जो संघ आज विजयी होईल त्याच संघाकडे मालिकेचे जेतेपद येईल. हे जेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघ चुरशीने खेळताना दिसतील. त्यामुळे शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना चुरशीचा असणार आहे.

सेन्चुरियनमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी चांगली होती. मात्र गोलंदाजांची कामगिरी ढेपाळली होती. ढेपाळलेल्या गोलंदाजीमुळेच टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. तो सामना जर टीम इंडियाने जिंकला असता तर आजचा सामना जिंकणे किंवा हरणे ही फक्त एक औपचारिकता असती. मात्र दुसरा सामना हातून गेल्याने विराटसेनेला आजचा सामना जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.

कसोटी मालिका गमावल्यावर भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन केले. त्यांचा हाच फॉर्म ट्वेन्टी-२० मालिकेत पाहायला मिळाला. आतापर्यंत सातत्यपूर्ण धावा करणारा भारताचा सलामीवीर शिखर धवन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येही आपली छाप पाडत आहे. विराट कोहलीही चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे आज फलंदाज कसे खेळतात याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

भारत आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत या दोन्ही संघांमध्ये सहा टी २० सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यापैकी ४ सामने भारताने जिंकले आहेत. एक दिवसीय सामन्यांप्रमाणेच टी २० मालिकेतही भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळी केली आहे. त्यामुळेच पहिल्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला धावांचा डोंगर रचता आला. आता आज नेमके काय होणार याकडे सगळ्या क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 2:40 pm

Web Title: the third t20 match between india and south africa today
Next Stories
1 स्वप्नवत दौऱ्याचा सुखद शेवट करण्याचा भारताचा निर्धार
2 भारतीय महिला संघ मालिकेतील दुहेरी यशासाठी उत्सुक
3 हजारे चषक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची कर्नाटकविरुद्ध कसोटी
Just Now!
X