News Flash

‘आयपीएल’दरम्यान आंतरराष्ट्रीय सामने नसावेत -पीटरसन

इंग्लंडच्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला २ जूनपासून प्रारंभ होत आहे

(संग्रहित छायाचित्र)

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट चालू असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांची योजना आखू नये, अशी विनंती इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने शुक्रवारी क्रिकेट मंडळांना केली आहे.

इंग्लंडच्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला २ जूनपासून प्रारंभ होत आहे. ‘आयपीएल’ संपल्यानंतर एकच दिवसानंतर या मालिकेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे इंग्लंडचे काही क्रिकेटपटू ‘आयपीएल’मध्ये सहभागाबाबत संभ्रमात आहेत. स्पर्धेच्या उत्तरार्धात ‘आयपीएल’ अर्धवट सोडणे किंवा राष्ट्रीय कर्तव्य टाळणे, हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे असतील. परंतु इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे संचालक अ‍ॅश्ले गाइल्स यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, इंग्लिश क्रिकेटपटूंनी ‘आयपीएल’पेक्षा राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देण्यासाठी आम्ही बंधन घालणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:11 am

Web Title: there should be no international matches during ipl peterson abn 97
टॅग : IPL 2021
Next Stories
1 करोनाबाधित सचिन इस्पितळात दाखल
2 “तू करोनाला षटकार ठोकशील”, पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाचा सचिनला खास संदेश
3 ‘स्टार’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निवृत्ती घेण्याच्या विचारात
Just Now!
X