News Flash

भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकत्रित खेळणार नाहीत -बीसीसीआय

गेली सात वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झालेल्या नाहीत.

| December 27, 2019 12:01 am

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये होणाऱ्या जागतिक एकादश संघाविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आशियाई एकादश संघाकडून एकत्रित खेळणार नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले.

बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त पुढील वर्षी मार्च महिन्यात दोन सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ आणि २१ मार्चला होणाऱ्या या दोन सामन्यांसाठी भारताच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे.

गेली सात वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झालेल्या नाहीत. परंतु विश्वचषक आणि आशियाई स्पर्धामध्ये या उभय संघांमध्ये सामने झालेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:01 am

Web Title: there will be no pakistan players in asia xi for bangladesh t20is says bcci zws 70
Next Stories
1 मुंबई जिल्हा कबड्डी स्पर्धा : एअर इंडिया, बँक ऑफ बडोदा अजिंक्य
2 अ. भा. मानांकन टेनिस स्पर्धा : महाराष्ट्राच्या सालसाला दुहेरी विजयाची संधी
3 “हिंदू होता म्हणून त्याला पाकिस्तानचे क्रिकेटपटू द्यायचे त्रास”; शोएब अख्तरचा गौप्यस्फोट
Just Now!
X