इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पैशांवर नजर ठेवून विराट कोहलीला खूश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे क्रि के टपटू त्याच्याशी पंगा घेण्यास टाळतात, हे माजी कर्णधार मायके ल क्लार्कचे आरोप कसोटी कर्णधार टिम पेन याने फेटाळून लावले. भारतीय कर्णधाराची बॅट शांत राखण्यासाठी रणनीती असल्याचे पेन याने स्पष्ट केले.

‘‘विराट किंवा अन्य भारतीय खेळाडूंविरोधात खेळताना ऑस्ट्रेलियाच्या क्रि के टपटूंचे वागणे बदलल्याचे मला कधीच जाणवले नाही. कोहलीविरोधात खेळणे कुणालाही सोपे जात नाही. पण विराट सर्वोत्तम खेळी करीत असताना त्याला चिथावल्यास तो त्वेषाने फलंदाजी करतो,’’ असे पेनने सांगितले.

भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासंदर्भात पेन म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिके त झोकून खेळतील. देशासाठी खेळताना ‘आयपीएल’चा करार कुणाच्याही डोक्यात नसतो,’’ असे पेन याने सांगितले.