मुंबईकर आणि भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून चांगल्याच फॉर्मात आहे. २०१९ विश्वचषकात झळकावलेली ५ शतकं, कसोटी संघातलं पुनरागमन अशी धडाकेबाज कामगिरी करत रोहितने आपलं संघातलं स्थान अधिक बळकट केलंय. नवीन वर्षात न्यूझीलंड दौऱ्यात रोहितला अखेरचा टी-२० सामना खेळताना दुखापत झाली आणि त्याला संघातलं स्थान गमवावं लागलं. यानंतर करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मार्च महिन्यापासून क्रिकेटचे सर्व सामने बंद आहेत.

लॉकडाउन काळात सर्व भारतीय खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. रोहित शर्माही आपली मुलगी समायरासोबत खेळतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर समायरासोबत खेळताना एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात समायरा आपल्या बाबांसोबत खेळताना हसताना दिसत आहे. रोहितही आपल्या मुलीसोबत खेळताना अगदी लहान झाल्यासारखा दिसत आहे. हे दिवस कधीही परत येणार नाहीयेत..या कॅप्शनने रोहितने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

These days are not coming back….

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

याव्यतिरीक्त रोहित सोशल मीडियावर आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असतो. करोनाच्या प्रादूर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.