आयपीएल म्हटलं की गोलंदाजांची सर्वाधिक धुलाई होण्याचं ठिकाण..फलंदाज आक्रमकपणे गोलंदाजांवर तुटून पडतात. गोलंदाजाने चेंडू टाकला की टाकला तो थेट सीमेपलीकडे पाठण्याचा फलंदाजांना निर्धार असतो. ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा, विराट कोहली यासारखे आक्रमक खेळाडू तर गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतात. यंदाच्या पर्वात बंगळुरु विरुद्ध चेन्नई सामन्यात रविंद्र जडेजाने हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर ३७ धावा ठोकल्या. यामुळे पर्पल कॅपचा मानकरी असलेल्या हर्षल पटेलची जोरदार चर्चा झाली. हर्षल हा पहिला गोलंदाज नाही की, ज्याला इतक्या धावा ठोकल्या. आयपीएलमध्ये आठ गोलंदाज असे आहेत की, त्यांनी आपल्या षटकात ३०हून अधिक धावा दिल्या आहेत.

प्रशांत परमेश्वरन
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा देण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीत कोच्ची टस्कर्सच्या प्रशांत परमेश्वरन याचं नाव आघाडीवर येतं. आयपीएलच्या चौथ्या पर्वात त्याने सर्वात महागडं षटक टाकलं होतं. आरसीबीच्या ख्रिस गेलने परमेश्वरनच्या गोलंदाजीच्या अक्षरश: चिंध्या केल्या. गेलने ४ षटकार आणि ३ चौकाराच्या मदतीने ३७ धावा केल्या. एक धाव नो बॉलच्या स्वरुपात मिळाली.

गंभीर म्हणतो, ‘मागील १२ वर्षातील KKRची “ही” सर्वात मोठी चूक’

हर्षल पटेल
आयपीएल २०२१ स्पर्धेत अष्टपैलू रविंद्र जडेजानं हर्षल पटेल याच्या गोलंदाजीवर ५ षटकार आणि एक चौकार ठोकला. एक षटकात त्याने ३७ धावा ठोकल्या. त्याच्या आक्रमक खेळीमुळे चेन्नईच्या धावसंख्येत मोठी भर पडली. जडेजाच्या या खेळीनंतर हर्षल पटेलच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.

परविंदर अवाना
आयपीएल २०१४ च्या स्पर्धेत पंजाबच्या परविंदर अवाना याला चेन्नईच्या सुरेश रैनानं अक्षरश: सळो की पळो करून सोडलं होतं. त्याने त्याच्या षटकात ३३ धावा ठोकल्या होत्या. पंजाबनं चेन्नईला विजयासाठी २२६ धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य गाठताना सुरेश रैनानं आक्रमक खेळी केली होती. त्याने ५ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर अवानाने एक नो बॉल टाकला होता.

जिंकलंस भावा… ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूने PM Cares निधीला दिले ३७ लाख रुपये

रवि बोपारा
आयपीएल २०१०च्या स्पर्धेत कोलकाता नाइटराइडर्सकडून खेळण्याऱ्या ख्रिस गेलने पंजाबच्या रवि बोपारा याची चांगलीच धुलाई केली. कोलकाताकडून तेव्हा खेळण्याऱ्या ख्रिस गेलने ४ षटकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. रवि बोपारा तेव्हा पुरता हतबल दिसून आला होता.

राहुल शर्मा
आयपीएल स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर राहुल शर्मा याचं नाव येतं. त्याच्या षटकात ३१ धावा आल्या होत्या. २०१३ आयपीएल स्पर्धेत राहुल शर्मा रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळत होता. बंगळुरुकडून खेळण्याऱ्या ख्रिस गेलने रवि बोपाराला ५ षटकार ठोकले होते.

अशोक डिंडा
महागड्या गोलंदाजाच्या यादीत रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा अशोक डिंडा सहाव्या स्थानावर आहे. त्याने २०१७ च्या आयपीएल स्पर्धेत सर्वात महागडं षटक टाकलं होतं. मुंबई इंडियन्सकडून खेळण्याऱ्या हार्दीक पंड्याने त्याच्या षटकात ३० धावा केल्या होत्या.

“मोदी स्टेडियमवर आज राहुल खेळणार”, जाफरचं गमतीशीर ट्विट होतंय व्हायरल

ख्रिस जॉर्डन
२०२०च्या आयपीएल पर्वात पंजाबकडून खेळण्याऱ्या ख्रिस जॉर्डननं सर्वात महागडं षटक टाकलं होतं. दिल्लीकडून खेळण्याऱ्या अष्टपैलू मार्कस स्टोयनिसनं त्याच्या गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी केली. स्टोयनिक आणि एनरिक या जोडीनं मिळून त्याच्या षटकात ३० धावा केल्या होत्या.

लुंगी एन्गिडी
आयपीएल कारकिर्दीत सर्वात महागडं षटक टाकण्याचा दुर्दैवी क्षण लुंगी एन्गिडी याच्या नशिबातही आला. आयपीएल २०२० या स्पर्धेत त्याने ३० धावा दिल्या. राजस्थानच्या जोफ्रा आर्चरनं ४ षटकार मारले होते.